Tuesday, November 23, 2021
मराठवाडा मुक्तिसंग्राम -- राजाराम भागोजी जाधव
साथी रामराव जाधव साहेब__________
कासीम रिजवी व त्याचा रजाकारी फौजेशी सरळ दोन हात करणारे राजाराम भागोजी जाधव यांचे चिरंजीव म्हणजे साथी रामराव जाधव साहेब.
विदर्भ मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानी चा गड म्हणजे सीमावर्ती भाग हिंगोली जिल्हा हा स्वातंत्र्य संग्राम मध्ये अत्यंत आघाडीवर राहून लढत राहिला.
थोर स्वातंत्र्यसेनानी राजाराम भागोजी जाधव पाटील ज्यांच्या मागे रजाकार पडल्यामुळे त्यांनी स्वतःच लढा उभा करत.
आपल्याबरोबर रामोशी व बंजारा समाजातील लढवय्या लोक घेतले.
प्रकारांशी दोन हात केल्यामुळे गावात राहता येत नव्हते त्यामुळे परिवार रोज शेतातील आखाडे बदलत राहत.
श्री रामराव जाधव साहेब यांच्या भाषेत सांगायचे झाले तर स्वातंत्र्यसंग्राम हे मराठवाड्यातील ग्रह युद्धाचे स्वरूप होते.
आकाराच्या विरुद्ध हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लढणे म्हणजे ग्रह युद्ध लढल्या सारखेच होते.
दत्त जीव वाचवण्यासाठी कुटुंबाबरोबर त्यांना आखाड्यावर आपले जीवन काढावे लागेल.
सतत शेतात लपून राहिल्यामुळे शाळेचा संबंध तुटला.
जेव्हा शाळेत टाकायचे होते तेव्हा वय 15 झाले होते आणि इयत्ता चौथी.
गोंड्याची टोपी घातलेले लोक गावात आले की गावात लोक कवाड कसे बंद करायचे.
आवाज अक्षरशः चिडीचूप शांतपणे थरथर कापायचे.
गोंड्याच्या टोपीवाला रज आकाराच्या हस्तकांनी जे जे मागितले ते गावातले लोक गपचूप त्यांच्या हवाली करायची.
त्याकाळचा परभणी हिंगोली जिल्ह्याचा इतिहास समजून घेत असताना साठी रामराव जाधव साहेबांना समजून घ्यावे लागेल.
रजाकारी कालावधीमध्ये प्रत्यक्षात काय घडले याचा अनुभव ज्यांनी स्वतः घेतला त्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे साथी रामराव जाधव साहेब.
रझाकारांच्या कालावधीनंतर शिक्षणासाठी हिंगोली गाठले त्याकाळी थोर समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब सवनेकर,
दतराव वरुडकर साहेब या दोघांनी शेतकऱ्यांच्या ग्रामीण मुलांना शिकण्यासाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राहण्यासाठी होस्टेल व खाण्याची व्यवस्था केली.
पुढचं शिक्षण सुरू झाले.
यांच्या कालावधीमध्ये त्यांनी आदरणीय बाबासाहेब सवनेकर साहेबांना अत्यंत जवळून पाहिले. त्याच बरोबर त्यांनी पुढे आदरणीय खासदार एडवोकेट शिवाजीराव देशमुख साहेबांना ही अत्यंत जवळून अनुभवले व पाहिले.
इतिहासाची पानं समजून घेताना इतिहासाचा सुवर्ण काळ समजून घेत असताना त्या काळातल्या हयात असलेल्या थोरामोठ्यांना समजून घेणे फार महत्त्वाचे असते.
आदरणीय साथी रामराव जाधव पाटील साहेब राष्ट्रीय पातळीवर ती चार दशक समाजवादी चळवळीमध्ये काम केले.
आदरणीय जयप्रकाश नारायण पासून एस एम जोशी साहेबां पर्यंत या सर्व थोर मंडळींच्या अगदी स्नेहपूर्ण सानिध्यात आपले जीवन काढलेले व्यक्तिमत्व उत्तर भारतामध्ये व्यवस्थित परिचित आहे.
संसदीय लोकशाही मध्ये ते निवडून आले नसतील परंतु संसदीय लोक प्रणाली ज्यांना समजते त्या मोजक्या लोकांपैकी एक नाव म्हणजे साथी रामराव जाधव.
आदरणीय साथी रामराव जाधव साहेबांनी आदरणीय खासदार एडवोकेट शिवाजीराव देशमुख साहेबांबद्दल अत्यंत मौलिक अशी जिवंत माहिती दिली.
वाचा त्या चर्चेत असे वाटून गेले दिवाळीमुळे छपाई मध्ये गर्दी असल्यामुळे पुस्तकाला थोडा उशीर झाला ते बरे झाले कारण त्या काळच्या बराच घटनेला आदरणीय सारखी रामराव जाधव साहेबांमुळे नव्याने उजाळा मिळाला.
ती परिस्थिती आणि त्याकाळचा कालावधीत तत्कालीन राजकारणाला दिल्लीच्या दृष्टीतून पुन्हा एकदा पाहण्याचे भाग्य मला लाभले.
साथी रामराव जाधव साहेब म्हणजे चालत बोलत ज्ञानाचं महाविद्यापीठ आहे.
त्यांच्याशी तासभर चर्चा केली म्हणजे तुम्ही इतिहासाची चारशे पान वाचल्याचा अनुभव तुम्हाला येऊन जाईल.
मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम मध्ये सर्वस्व गमावलेल्या परिवारा पैकी साठी रामराव जाधव साहेब यांचा परिवार तो आपण काही विशेष केलं असं कधीही त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत नाही.
झोपडपट्टीच्या माध्यमातून घर बसून देणारा हा पहिला मराठवाड्यातला समाजसेवक परभणी शहरातील क्रांती नगर हे त्याचे जिवंत प्रतीक आहे.
माझी प्रधानमंत्री चंद्रशेखर साहेबांचे आणि साठी रामराव जाधव साहेबांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. निपाणी मध्ये बाबूजी म्हणजेच चंद्रशेखर साहेबांच्या बॅरेकमध्ये एकाच रूम मध्ये राहण्याचे भाग्य साथी रामराव जाधव साहेबांना मिळाल.
समाजवादी राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वामध्ये सर्वांनाच मुखावर नाव असलेले साथी रामराव जाधव यांनी राजकारणाच्या माध्यमातून अर्थकारण अथवा सत्ता असा व्यवसाय कधीच केला नाही.
अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणारी माणसं कधीच अर्थकारणाचा धंदा करत नसतात हे यातून मला शिकता आले.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर चे राजकारण समजून घेत असताना साठी रामराव जाधव साहेबांशी चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे.
क्रमशः... भाग .पहिला.....
लेखक: सतीश सातोनकर. परभणी .धन्यवाद.
Subscribe to:
Posts (Atom)