जेव्हा साधूंची हत्या होते..
दिनांक १६/०४/२०२० रोजी पालघर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली ज्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत. ही घटना लोक क्षोभातून , समूह मानस शास्त्र ने ( mob lynching) की गैरसमजातून घडली ?ज्या वनवासी बांधवाकडून सदैव माणुसकीचे दर्शन घडते त्यांच्याच कडून हे असे कृत्य कसे झाले? कोण याला जबाबदार आहे?
पालघर हा आदिवासी जिल्हा आहे . याच परिसरांत आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, ख्रिश्चन मिशनरी, कम्युनिस्ट इत्यादी संघटानांचे काम चालते. त्यांची कामे परस्परांशी संगनमताने चालत असतातभोळ्या भाबड्या आदिवासींना , ' तुम्ही मूलनिवासी आहेत , हिंदू नाहीत , जंगलात तुमचेच राज्य, आदिवासींना धर्म नाही, आदिवासींचा देव रावण आणि राम अन्यायी राजा ' अशी चिथावणी देण्याचे काम राजरोसपणे चालू असते.
दिनांक १४ एप्रिल पासून विचित्र प्रचार सुरु झाला. पालघर जिल्ह्यात " चोर येतात , लुटतात, लहान मुलांना पळवतात , किडनी काढून नेतात" अशा अनेक अफवांना ऊत येतो. या अफवा अचानक कोणी सुरू केल्या? एखाद्या कुटील कारस्थानाचा तो भाग आहे का? या प्रश्नांची उत्तर शोधणे अत्यावश्यक आहे. याच्या परिणामी डहाणू सारणी येथे डॉक्टर विलास वळवी आणि पोलीस अधिकारी काळे साहेब ह्यांना जमावाकडून मारहाण होते. गरीबांना मदत देण्यास गेलेल्या लोकांवर हल्ला कोणत्या विचारातून होतो? अन्यही मारहाणीच्या दोन चार घटना घडतात. पण याची बातमी जगासमोर येत नाही, का?
पोलिस यंत्रणेद्वारे अफवांना बळी पडू नका , शांतता राखा असे आवाहन केले जाते परंतू अद्यापही विद्यमान आमदार विनोद निकोले ( CPM) , सुनील भुसारे ( NCP) , श्रीनिवास वनगा ( शिवसेना) , राजेश पाटील ( BVP) ह्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नव्हती.
दि. १६/०४/२०२० , गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास एका कारला गडचींचले येथे अडवले गेले . जमावाने तीन यात्रेकरूंना थोडीफार मारहाणही केली . गावच्या भाजपा सरपंच सौ . चित्रा चौधरी ह्यांनी मध्यस्थी करून जमावाला शांत केले आणि त्या यात्रेकरूंना वनविभागाच्या चौकीत आश्रय दिला . वनविभागाच्या अधिकाऱ्याने कासां पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य श्री काशिनाथ चौधरी ह्यांना घेवून पोलिसांची जीप रात्री १०:३० ते ११:०० च्या सुमारास आली . दरम्यानच्या एक दीड तासाच्या कालावधीत अशा घडामोडी घडल्या की स्थानिक कम्युनिस्ट आमदार निकोले ह्या प्रकरणाशी " मी या गावचा नाहीच " अशा शहाजोगपणे राहिले पण आजूबाजूच्या दाभाळी, दिवसी, किन्हवली ह्या गावातील कार्यकर्ते ( कम्युनिस्ट पक्षाचे असल्याचे बोलले जाते) काठी , दांडके, दगड घेवून मोठ्या संख्येने गडचिंचले येथे जमा झाले.श्री काशिनाथ चौधरी ह्यांनी जमावाला समजावण्याचा असा काय प्रयत्न केला की जमाव जास्तच उग्र झाला ? समोर चोर नाहीत , साधू आहेत , ते विनवणी करीत आहेत हे लक्षात येऊन सुध्दा हिंदू द्वेषाचे विष प्यालेला जमाव दोन्ही साधूंना क्रूरपणे मारतात आणि सर्व काही ठरल्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी दोन गुरूंची अमानुषपणे हत्या केली जाते शिवाय साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून ड्रायव्हरला सुध्दा ठार मारले जाते . उपस्थित पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेतात हे सर्व व्हायरल व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसून येते .
त्याच रात्री पोलिसांचे अटकसत्र सुरूव होते. अटक होते परंतू गडचिंचले येथील जंगलात पळून गेलेल्या खरया मारेकऱ्यांचा शोध घेतला गेलेला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे तीनही हुतात्म्यांचे पार्थिव देह सकाळपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे पडून होते. शासनाने रुग्णवाहिकेची सोय सुध्दा केली नव्हती. ( सकाळी शासनाने खटारा वजा वाहनांची सोय तर केली परंतू त्यांचे शव उचलायला पोलिसांनी नाकारले तेव्हा नाशिकच्या साधूनींच त्यांना वाहनात ठेवले आणि विच्छेदन ( Post mortem) करता तलासरी आरोग्य केंद्रात नेले)
ह्या घटनेला नाट्यमय स्वरूप दिले जाते . दि. १७/०४/२०२० रोजी कोणीतरी तीन चोरांना ठार मारले अशी बातमी पसरते . ते हिंदू साधू होते हे शासन दरबारी दडपले जाते परंतु व्हिडीओ व्हायरल होतो आणि वास्तव समोर येते.पोलीस चौकशीत भाजपाच्या एकमेव सरपंच असलेल्या सौ . चित्रा चौधरी मारेकऱ्यांची माहिती देतात. लगेच त्यांना कुटुंबीयांसहित जीवे मारण्याची धमकी येते .त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे परंतू भय इथे संपलेले नाही.
येथील सुजाण नागरिकांना प्रश्न पडतात ते असे -
१) सुरवातीला चोर म्हणून हत्या झाली असे का भासविले गेले ?
२) हिंदू साधूंना चोर किंवा अतिरेकी ठरवण्याचा हा प्रयत्न तर नव्हता??
३) प्रत्यक्ष घटना घडताना पोलिसांची बघ्याची भूमिका संशयास्पद नाही का ? पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही ??
४) असे मारहाणीचे प्रकार घडले असताना आणि यावेळी जमाव हिंसक झाला आहे हे माहिती असताना पुरेसा पोलिस फोर्स का पाठवला गेला नाही?
५)मृतदेहाकरिता सरकारी वाहनाची सोय केली पण त्यांना उचलून ठेवण्याचे काम सुध्दा केले नाही( पहाटेपर्यंत शव रस्त्यावर ठेवणे) ही अनास्था ते हिंदू साधू होते म्हणून का ?
६) टाळेबंदी असताना हा जमाव एकत्र आलाच कसा?
७) साधू वनअधिकारयाच्या सुरक्षेत असताना जमावाला चिथावणी कोण देत होते?
८) गडावर पळून गेलेल्या अपराध्या बाबत शासनाला माहिती आहे का ? असेल तर काय कार्यवाही झाली?
९) भोळ्या भाबड्या आदिवासींना हिंदू विरोधात चिथावणी देवून त्याच्या कडून अमानुष कृत्य घडवणारे नेमके कोण आहेत ? त्याच्या विरोधात कारवाई होणार का ?
१०) आमचे माननीय मुख्यमंत्री ह्या जघन्य अपराधा ला गैरसमजुतीचे पांघरूण का घालत आहेत ? तसेच दुसऱ्या राज्यातील पोलीस यंत्रणेवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न का करीत आहेत ??
११) हे शासन हिंदूंना न्याय देणार का? की हिंदूंनी अन्याय निमुटपणे सहन करावा ?
-
श्री . गोपीनाथ भीमा अंभिरे
धाकटी डहाणू
२१/०४/२०२०.
No comments:
Post a Comment